मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मराठा आरक्षणावरील पुनर्विचार याचिका पुढे ढकलण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजी म्हणजेच आज मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही याचिका पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर मराठा आरक्षणासंदर्भात १२ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते राज्य सरकारने करावे, असे विनोद पाटील म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version