पंतप्रधान मोदींकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

गेली दोन वर्ष सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. तसेच सण-उत्सवसुद्धा घरीच साजरे करावे लागले. मात्र, यंदाचा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नुतन वर्ष निर्बंधमुक्त असल्यामुळे राज्यात नागरिकांमध्ये मोठ्या उत्साह पाहण्यास मिळत आहे. राज्यसरकारकडून राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी गुढीपाडव्याच्या शोभायात्रा निघाल्या. दरम्यान, राजकीय नेतेमंडळांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्य आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनेतला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

‘नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी नवर्षाच्या दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गेली दोन वर्षे काळोखात गेली. हा काळोख दूर करून हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आनंदाचे आरोग्यसंपन्न जाओ ही प्रार्थना. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्री म्हटले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version