Kerala Couple Emotional Moment: वधूच्या अपघातानंतर नवरदेवाने रुग्णालयातच बांधली लग्नगाठ; हृदयस्पर्शी क्षण पाहून नेटीझन्सला आली विवाह चित्रपटाची आठवण

वधू अविनला कार अपघातामुळे हातापायांना दुखापत झाली. मात्र, ठरलेला मुहूर्त बदलणे कुटुंबीयांना मान्य नव्हते.
Kerala Couple Emotional Moment: वधूच्या अपघातानंतर नवरदेवाने रुग्णालयातच बांधली लग्नगाठ; हृदयस्पर्शी क्षण पाहून नेटीझन्सला आली विवाह चित्रपटाची आठवण

Kerala Couple Emotional Moment: केरळमध्ये घडलेली एक प्रेमकहाणी सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नापूर्वीच गंभीर अपघात झालेल्या वधूला सोडून न जाता, वराने थेट रुग्णालयात तिच्याशी विवाह केला आहे. हे दृश्य पाहून अनेक नेटिझन्सना तुफान हिट ठरलेल्या 2006 मधील “विवाह” चित्रपटातील प्रसंगांची आठवण झाली.

अपघातानंतर थेट रुग्णालयात लग्न

कोची येथील एका खासगी रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. वधू अविनला कार अपघातामुळे हातापायांना दुखापत झाली. मात्र, ठरलेला मुहूर्त बदलणे कुटुंबीयांना मान्य नव्हते. वर शेरोन व्ही.एम. यांनी परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाची परवानगी घेतली आणि कोणत्याही सजावटी शिवाय साधेपणाने विवाह उरकला. रुग्णालयातील बेडवरच शेरोन यांनी अविनलाच्या गळ्यात मंगलसूत्र बांधले. डॉक्टर, नर्सेस आणि काही नातेवाईक यांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

हेही वाचा – Woman Cooks Maggi In Kettle Onboard Train: ट्रेनमध्ये मॅगी बनवणे महिलेला पडले महागात! AC कोचमध्ये इलेक्ट्रिक केटल वापरल्याने रेल्वेची कारवाई

सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

दरम्यान, @rajini198080 या हँडलवरून पोस्ट केलेला हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला असून, या व्हिडिओला 1.5 लाखांहून अधिक व्ह्यूज, 3500 पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तथापी, युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “खरं प्रेम असं असतं!” तथापी, एका यूजरने म्हटलं आहे की, “विवाह चित्रपटाची आठवण झाली.” तसेच आणखी एका युजर्सने म्हटलं आहे की, “जोडप्याला खूप खूप आशीर्वाद…वधू लवकर बरी होवो!” 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version