गोकुळच्या लेखापरीक्षणाचा निकाल लवकरच

गोकुळच्या लेखापरीक्षणाचा निकाल लवकरच

गोकुळ दूध संघाच्या लेखापरीक्षणाचा निकाल लवकरच हाती येणार आहे. दरम्यान, गोकुळ दूध संघाचे लेखापरीक्षण होण्याच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायालयात मागणी दाखल केली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तर, दुधाचा दर्जा घसरला असल्याची टीका विरोधकांवर होत आहे.

याप्रकरणी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेल्या दीड वर्षापासून गोकुळ दूध हा संघ विरोधकांच्या ताब्यात होता. दरम्यान, संघात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे कारभार सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकूळ दूध संघाच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. हे लेखापरीक्षण होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच दुधाचा दर्जा ढासळत असून गोकुळ ब्रँडचा दर्जा देखील कमी होत असल्याची टीका धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर केली आहे.

काय आहे प्रकरण?

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. दरम्यान, हे लेखापरीक्षण थांबवून याप्रकरणी चौकशी करू नये यासाठी गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळून लावली आहे. तर, लवकरच गोकुळच्या लेखापरीक्षणाचा निकाल हाती लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version