सीमेवरचा गवा अखेर सांगलीत दाखल

सीमेवरचा गवा अखेर सांगलीत दाखल

सांगलीच्या सीमेवर घुटमळणारा गवा मध्यरात्री सांगली शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रम करीत सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड गाठले. शहरात मध्यरात्री असणाऱ्या निरव शांततेमुळे गवा न भुजता दिसेल त्या मार्गाने पुढे जात आहे.

दोन दिवसांपूर्वी सांगली वाडीत दिसलेला गवा मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे सांगली शहरात दाखल झाला आहे. टिळक चौक मार्गे गवा शहरात आला असून वाखारभाग, कॉलेजकॉर्नर मार्गे तो सध्या सांगलीच्या मार्केट यार्डात दाखल झाला आहे. गव्याला वास्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र प्रयत्न करत आहेत मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version