गणेश नाईकांना जामिन मिळेल ? 

गणेश नाईकांना जामिन मिळेल ? 

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. गणेश नाईक यांच्या वकिलामार्फत अजून कुठलेही ऍफिडेवीट सादर करण्यात आलेले नाही, तर आजच्या सुनावणीत ते सादर होण्याची शक्यता दीपा चौहान यांच्या वकिलांनी वर्तवली आहे. परंतु, त्यांना जमीन मिळू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले आहेत.

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गणेश नाईक यांनी तक्रारदार महिलेशी नातं असल्याची कबुली दिली होती. तर, आता बुधवारी या प्रकरणाची ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नाईक यांच्यावर दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांच्या अटकपूर्व जामिनावर ही सुनावणी असून नाईकांच्या वकिलाने अद्याप कुठलेही ऍफिडेवीट सादर केलेले नाही. हे ऍफिडेवीट आज सादर केले जाऊ शकते असं म्हंटल जातंय मात्र दीपा चौहान यांच्या वकिलाने जमीन मंजूर होऊ देणार नाही असं वक्तव्य केले आहे. यादोन्ही प्रकरणात गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन भेटू नये यासाठी आम्ही युक्तिवादाची संपूर्ण तयारी केली आहे. जामीन नाकारला जावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दीपा चौहान यांच्या वकिलांनी व्यक्त केलीय.

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर २७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version