बीड येथील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

बीड येथील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

वाहन चालकांच्या भरधाव वेगामुळे अथवा खराब रस्त्यांमुळे सतत अपघात सुरूच असतात. दरम्यान, बीड जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीरित्या जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना कळताच पोलीस प्रशासन घटनेत ठिकाणी तात्काळ दाखल होऊन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा मृतदेह तात्काळ जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पाटोदा तालुक्याजवळ कार आणि टेम्पोच्या चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोची अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झालेले असून हे गेवराई तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. मात्र, यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version