भाजप माजी मंत्री परिणय फुके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजप माजी मंत्री परिणय फुके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्री के. सी. पाडवी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

भंडारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी दरम्यान भ्रष्टाचार झाला. तर याचे जाळे मंत्रालयापर्यंत पसरले असून मंत्री के.सी. पाडवी यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. त्यामुळे भाजप आमदार माजी मंत्री परिणय फुके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंत्री के. सी. पाडवी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा धान घोटाळा झाल्यामुळे मंत्री के.सी. पाडवी यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून भंडारा जिल्ह्याला न्याय देण्याची मागणी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

हे धान घोटाळाप्रकरण आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक सोपान सांभारे यांच्या कार्यकाळातील आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोपान सांभारे यांची बदली  करण्यात आली होती. मात्र आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांच्यामुळे सोपान यांची बदली भंडारा येथे करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version