देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरीही धोका मात्र कायम आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, मंगळवारी रोजच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळाली. ४० हजारांखाली आलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी नवीन कोरोना रुग्णसंख्या ४३ हजार ७३३ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात ४३ हजार ७३३नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत ९३० जणांचा मृत्यू झाला आहे. ४७,२४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७. १८ टक्केंवर पोहचला आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारपासून सोमवारच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत ९ हजारांनी घट झाली आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version