मेळघाटच्या धारणी शहरात शासकीय विश्रामगृहाच्या मागे २ घरांना अचानक भीषण आग लागली. दोन्ही ही घराच्या कामात जुन्या पद्धतीच्या सागाच्या लाकडांचा वापर करण्यात आल्याने आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.तसेच घरात साठवलेल्या हरभरासह साहित्य आगीत जळून खाक झाला.जळून खाक झालेल्या वस्तूंची किंमत अंदाजे ३० लाख होती. दरम्यान धारणी शहरात २० दिवसात अशी घटना पुन्हा घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
रात्रीच्या वेळी ही आग लागली असल्याने सर्वदूर आगीचा प्रकाश पसरलेला दिसला. विशेष म्हणजे पालिकेच्या ३०० मीटर अंतरावर घटनास्थळ असताना अग्निशामक उशिरा घटनास्थळी पोहचली. आगीत महेश आणि जगदीश मालविये यांच्या घराची राखरांगोळी झाली. नेमकी ही आग कशामुळे लागली असावी याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.