नगरमधील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावात पित्यानेच आपल्या पाच वर्षीय मुलाची हत्या केली आहे. यानंतर त्या पित्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यासोबतच त्याने पत्नीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या घटनेचे ठोस कारण अद्यापही कळू शकले नाही.आदिनाश संतोष रासकर वय ५ वर्ष असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर संतोष राघू रासकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याची पत्नी सुजाता रासकर ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.