कोट्यवधी रुपयांच्या नकली नोटा जप्त

कोट्यवधी रुपयांच्या नकली नोटा जप्त

हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे नकली नोटांचा साठा पोलिसांनी पकडला आहे. औंढा नागनाथ पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान औंढा नागनाथ शहरातील ग्रामीण रूग्णालय परिसरात संशयित आढळल्याने त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल एक कोटी १४ लाख रुपये किमतीच्या नकली नोटा सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी औंढा नागनाथ येथून सहा आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टोळीतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून यात एका महिलेचा ही समावेश आहे. यातील आरोपी हे नांदेड, लातूर बुलढाणा जिल्ह्यातील असून नकली नोटा चालवणारे मोठे रॅकेट असू शकते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी आपण श्रीमंत असल्याचा बनाव करण्यासाठी बेंटेक्सचे सोने अंगावर घालून फिरत असत. १ लाख रुपये देऊन त्याबदल्यात बनावट ३ लाख रुपये देत फसवणूक केली जायची अशी या टोळीची कामाची पद्धत होती. पोलिसांना बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

‘१ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करताना, ९.३० ते १०च्या दरम्यान सरकारी दवाखाना रोडवर काही जण वाद घालताना दिसून आले. तेव्हा पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. यावेळी औरंगाबादच्या मुज्जफर नजीम शेख नावाच्या महिलेकडे एक बॅग होती. या महिलेच्या वागण्यात संशय वाटल्याने तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर बॅग तपासली असता 49 लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. महिलेने सांगितले की, साडेबारा लाख दिल्यानंतर मला या नोटा देण्यात आल्या आहेत. अधिक चौकशी केली असता महिला उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागली. यावेळी केशव वाघमारे यांनी हे षडयंत्र असल्याचे सांगत एक लाखांचे तीन लाख मिळतात ही माहिती विनोद शिंदे नावाच्या व्यक्तीने दिली होती. ही व्यक्ती त्या महिलेच्या संपर्कात होता. मिळालेल्या माहितीवरुन आम्ही लातूर येथे जाऊन परमार नावाच्या व्यक्तीची चौकशी केली आणि वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण जिल्हाच्या सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली. यावेळी एक फॉर्च्युनर गाडी वेगाने जात असल्याची माहिती मिळताच त्याची माहिती नाकाबंदीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर गाडीला थांबवून ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले,’ अशी माहिती औढ्यांचे सहायक पोलीस निरीक्षक विषवनाथ झुंजार यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version