EPFO E-Passbook: PF चे पैसे जमा होतायत का? घरबसल्या 5 मिनिटांत ‘असं’ चेक करा..

दरमहा पगारातून भविष्य निर्वाह निधी (PF) कापला जातो, पण तो EPFO कडे जमा होतोय की नाही, हे अनेक कर्मचारी तपासतच नाहीत. याचाच फायदा घेऊन काही कंपन्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी
EPFO E-Passbook: PF चे पैसे जमा होतायत का? घरबसल्या 5 मिनिटांत ‘असं’ चेक करा..

दरमहा पगारातून भविष्य निर्वाह निधी (PF) कापला जातो, पण तो EPFO कडे जमा होतोय की नाही, हे अनेक कर्मचारी तपासतच नाहीत. याचाच फायदा घेऊन काही कंपन्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आता ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही घरबसल्या फक्त 5 मिनिटांत मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून मालकाने PF चे पैसे भरलेत की नाही, हे तपासू शकता.

पासबुकद्वारे अशी करा पडताळणी
EPFO च्या नियमानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळालेल्या 12 अंकी UAN नंबरच्या मदतीने दरमहा PF खात्यात जमा होणाऱ्या रकमेची माहिती पाहता येते.

PF कपातीचे सत्य कसं तपासाल?
1. अधिकृत पोर्टलवर जा: सर्वात आधी EPFO Member Passbook Portal वर लॉगिन करा.
2. लॉगिन करा: तुमचा 12 अंकी UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
3. Aadhaar OTP व्हेरिफिकेशन: सुरक्षिततेसाठी आता तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
4. पासबुक पाहा आणि डाऊनलोड करा: लॉगिन झाल्यावर 'Passbook' टॅबवर क्लिक करा आणि तुमचा Member ID निवडा. इथे तुम्हाला तुमचा हिस्सा आणि कंपनीने (Employer) जमा केलेल्या रकमेचा ,प्रत्येक महिन्यानुसार तपशील दिसेल. ही पासबुक तुम्ही PDF मध्ये डाऊनलोडही करू शकता.

UMANG ॲपवरून कसं तपासाल?
वेबसाईट वापरता येत नसेल तर केंद्र सरकारच्या अधिकृत UMANG ॲपवरूनही हे काम सोपं आहे:
Play Store / App Store वरून UMANG App डाऊनलोड करा.ॲ
पमध्ये लॉगिन करून 'EPFO' सर्च करा आणि 'View Passbook' वर क्लिक करा.  
UAN नंबर टाकून OTP ने व्हेरिफाय करा, तुमची संपूर्ण पासबुक मोबाईलवर दिसेल.

हेही वाचा – WhatsApp Cloud Storage: व्हॉट्सॲप आणतंय स्वतःचं क्लाऊड स्टोरेज; 1 डॉलरमध्ये 50 GB, चॅट बॅकअपसाठी पैसे मोजावे लागणार?

इंटरनेटशिवाय बॅलन्स चेक करण्याचे 2 सोपे पर्याय
1. मिस्ड कॉल सेवा: PF ला लिंक असलेल्या नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल द्या. काही सेकंदात कॉल कट होऊन बॅलन्सचा मेसेज येईल.
2. SMS सेवा: तुमच्या रजिस्टर मोबाईलवरून "EPFOHO UAN MAR" असा मेसेज टाईप करून 7738299899 वर पाठवा. तुम्हाला मराठीतून माहिती मिळेल. 

मालकाने PF चे पैसे भरले नाहीत तर काय कराल?
पगारातून पैसे कापूनही पासबुकमध्ये दिसत नसतील, तर हा कायद्याने गुन्हा आहे. अशा वेळी तुम्ही थेट EPFiGMS Portal वर जाऊन कंपनीविरोधात ऑनलाईन तक्रार (Grievance) दाखल करू शकता. तक्रार मिळताच EPFO कंपनीची चौकशी करून कारवाई करते आणि तुमचे पैसे व्याजासह खात्यात जमा करून देते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version