WTF Podcast: झेरोदा (Zerodha) चे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी एक अनपेक्षित आणि प्रचंड चर्चेत येणारा खुलासा केला आहे. त्यांच्या लोकप्रिय WTF पॉडकास्टच्या पुढील भागात जगातील सर्वात चर्चेत असलेले उद्योजक एलोन मस्क सहभागी होणार असल्याची मोठी घोषणा सोशल मीडियावर केली. ही घोषणा होताच इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडाली आणि चाहत्यांकडून “हे खरोखरच घडत आहे की एआयने बनवलेला स्टंट?” असा प्रश्न विचारला जात आहे.
निखिल कामथ आणि एलोन मस्क एकाच फ्रेममध्ये
कामथ यांनी या एपिसोडचा ब्लॅक–अँड–व्हाइट टीझर पोस्ट केला आहे. 39 सेकंदांच्या या क्लिपमध्ये दोघेही एका ऑफिससारख्या सेटअपमध्ये बसून कॉफीचा आनंद घेत गप्पा मारताना दिसतात. शेवटी दोघेही हसताना दिसतात आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
AI की रियल? सोशल मीडियावर मोठा वाद
या पोस्टला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कामथ यांनीही कॅप्शन म्हणून विनोदी शैलीत लिहिले, “याला कॅप्शन द्या.” त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना मस्कला टॅग केले आहे. टीझरमधील सिनेमॅटिक क्वालिटी पाहून अनेकांना शंका आली की हे खरंच शूट केलेलं आहे की एआयचा वापर केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “हा व्हिडिओ एआयने केलेला वाटतो… खरंच आहे का हे?” तर दुसऱ्याने म्हटले आहे की, “भाऊने एलोन मस्कला देसी स्टाईलमध्ये चहा पाजला.
हेही वाचा – Trump Tariffs Impact : लहान व्यवसायांना ट्रम्प टॅरिफचा फटका, गोदामांतील साठाही संपला…
तथापी, उद्योगातील जाणकारांनी या भेटीला ऐतिहासिक क्षण संबोधले आहे. एका युजरने म्हटलं आहे की, “वित्त व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे दोन लोक एका टेबलावर बसले आहेत. मस्कच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 800 अब्ज डॉलर्स, आणि कामथ भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकर्स चालवतात. हा एपिसोड महत्त्वाचा ठरणारच!” प्रेक्षकांच्या अंदाजानुसार या एपिसोडमध्ये तंत्रज्ञान, अवकाश, एआय, व्यवसाय, गुंतवणूक, तसेच काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात.
Caption this@elonmusk pic.twitter.com/cYluYqm8S8 — Nikhil Kamath (@nikhilkamathcio) November 28, 2025
दरम्यान, निखिल कामथ यांचा ‘WTF’ पॉडकास्ट जगभरातील हाय-प्रोफाइल पाहुण्यांसाठी एक आवडता प्लॅटफॉर्म बनला आहे. मागील पाहुण्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, बायोटेक प्रणेते किरण मजुमदार-शॉ, बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी, उद्योगपती कुमार बिर्ला, परप्लेक्सिटी एआयचे अरविंद श्रीनिवास आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट विनोद खोसला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतचा सर्वात चर्चेत भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा संवाद, जो जागतिक स्तरावर प्रचंड चर्चेत आला होता. तथापी, नव्या ‘WTF’ पॉडकास्टचा टीझर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांना आता संपूर्ण एपिसोडची आतुरता लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.