अजित पवारांच्या मावसभावाच्या घरी ईडीची धाड

अजित पवारांच्या मावसभावाच्या घरी ईडीची धाड

  सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापा टाकला आहे. अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर आज ईडीने धाड टाकली आहे. जगदीश कदम हे दौंड शुगर्स साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यामुळे दौंड शुगर आणि जरंडेश्वर कारखान्यात गैरव्यवहार केल्याप्रकरणी  ईडीने कारवाई केल्याचे समोर आले आहे.

  जगदीश कदम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ आहेत. जगदीश कदम हे दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक आहेत. मात्र त्यांनी साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे जगदीश कदम यांच्या पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version