चौंडीत वाद

चौंडीत वाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे मंगळवारी अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली, त्याअगोदर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर अहिल्यादेवी जागर यात्रेच्या समारोपासाठी पोहोचले होते. मात्र, त्यांचा ताफा अडवल्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे परिसरात राडा पाहायला मिळाला. नाशिकच्या शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच वाद निर्माण झाला. बसण्यावरुन हा वाद निर्माण झाल्याने येथे गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी आमच्यावर बळाचा वापर केल्याचा आरोप पडळकर आणि खोत यांनी केला आहे.

चौंडीत जाण्यापासून पडळकर आणि खोत यांना रोखल्याने कार्यकर्ते संतप्त झालेत. त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सोहळ्याला जाताना आमची अडवणूक का, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही त्याला उपस्थित राहू शकते, असेही ते म्हणाले.

याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? जयंतीला का आला नाहीत? का दर्शनासाठी येथे आला नाहीत? आता तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि आमचं ऊर्जास्थान तयार झालेल्या चौंडी येथे तुम्हाला हल्ला करायचा आहे. आम्ही यात्रेवर ठाम आहे, गोपीचंद पडळकर म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले. पवारांनी समोरासमोर सभा लावावी असे सांगत शरद पवार यांचे हे कुठलं पुरोगामित्व, असे पडळकर म्हणाले.


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version