दिलीप सोपल यांनी केला शिवसेनेत प्रवेश

दिलीप सोपल यांनी केला शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांची युतीत इनकमिंग सुरू आहे. सोलापुरातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केले आहे. दिलीप सोपल यांच्यासह कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कॉंग्रेस कार्यकर्ते नागनाथ क्षीरसागर यांनीही सिवसेनेत प्रवेश केला आहे.

दिलीप सोपल यांचा शिवसेनेत प्रवेश –

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

सोपल यांच्याबरोबर कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कॉंग्रेस कार्यकर्ते नागनाथ क्षीरसागर यांनीही सिवसेनेत प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे सांगतील तिथून मी निवडणूक लढवणार असल्याचे दिलीप माने यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले पक्षात प्रवेश करणाऱ्यांना अंधारात ठेवत नाही.

तसेच पक्षात जे येतात ते पदासाठी येत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version