Dhurandhar box office: 23 दिवसांनंतरही ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर कहर; सिनेमाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत 23 व्या दिवशीही जोरदार कमाई केली आहे.
Dhurandhar box office: 23 दिवसांनंतरही ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर कहर; सिनेमाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

Dhurandhar box officeरणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राज्य करत आहे. रिलीज होऊन तीन आठवडे उलटून गेले तरी या सिनेमाची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाही. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘धुरंधर’ने प्रेक्षकांना भुरळ घातली असून, कमाईच्या बाबतीत हा सिनेमा अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकताना दिसतो आहे.

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच 600 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. रणवीर सिंहच्या दमदार अभिनयासोबतच कथानक, अ‍ॅक्शन आणि भव्य मांडणी यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरकडे खेचले जात आहेत.

23 व्या दिवशीही दमदार कमाई

उपलब्ध बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग अहवालांनुसार, ‘धुरंधर’ने 23 व्या दिवशीही जोरदार कमाई नोंदवली आहे. चौथ्या शनिवारी सिनेमाने अंदाजे 20 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत आकडे जाहीर व्हायचे असले तरी या कमाईमुळे सिनेमाचे एकूण कलेक्शन 660 कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या दिवसांनंतरही हिंदी बेल्टमधील ऑक्युपन्सी समाधानकारक राहिली आहे. यामुळे सिनेमाची पकड अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट होते.

मोठ्या चित्रपटांना मागे टाकले

‘धुरंधर’ने याआधी प्रदर्शित झालेल्या अनेक बिग बजेट सिनेमांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत आघाडीवर असलेल्या मोठ्या साय-फाय आणि अ‍ॅक्शन चित्रपटांनाही या सिनेमाने मागे टाकले आहे. विशेषतः तिसऱ्या आठवड्यातही कमाईत सातत्य राहणे, ही बॉलीवूडसाठी मोठी बाब मानली जात आहे.

कलाकारांची फौज आणि अभिनयाची चर्चा

या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत सारा अर्जुन प्रमुख महिला भूमिकेत दिसते. याशिवाय संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. विशेष उल्लेख अक्षय खन्नाचा करावा लागेल. त्याच्या सशक्त अभिनयाची सर्वत्र चर्चा असून, त्याचे काही सीन आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आयशा खान आणि क्रिस्टल डिसूझाचे नृत्यही प्रेक्षकांना विशेष भावले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version