विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विटस करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचा फडणवीसांनी समाचार घेतला आहे. हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही! असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी १४ ट्विट्समधून पवारांवर टीका केली आहे.
१) अनुनयाच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना करून दिले काही बाबींचे स्मरण.
२) आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित.
३) काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही घेतला समाचार.
४) नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचे करून दिले स्मरण.
५) इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण.
६) एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख.
७) २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख.
८) संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला?
९) अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचे करून दिले स्मरण.
१०) हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत निशाणा.
११) सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख.
१२) मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित.
१३) काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?
१४) काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही!
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.