कोरोनानंतर आता येणार डेंग्यूची लस

कोरोनानंतर आता येणार डेंग्यूची लस

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : डेंग्यू आजार सध्या देशभरात पसरलाआहे. सिरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस आणणार आहे. डेंग्यूवरील लस वर्षभरात मार्केटमध्ये आणणार आहे. अशी घोषणा भारतातील व्हॅक्सिन किंग सायरस पूनावाला केली आहे. पुढील १ वर्षात डेंग्यूवर उपचार करण्यासाठी लस बाजारात उपलब्ध असेल.सायरस पूनावाला म्हणाले की, डेंग्यूवरील लसीची आफ्रिकन देश आणि भारतात खूप आवश्यकता आहे. येथे दरवर्षी लाखो लोक या आजाराने संक्रमित होतात.

कोरोनावरील कोव्हिशिल्डच्या लसीच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट मलेरिया, व डेंग्यूवर लस बाजारात आणणार आहे. या लसीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. गेल्या अनेक वर्षापासून सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या व्हॅक्सिनवर काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सीरमने एक रिपोर्ट समोर आणला. ज्यात एका माणसाला डेंग्यूची लस देण्यात आली. ती सुरक्षित आणि चांगले परिणाम देणारी ठरली. डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सातत्याने चाचणी करण्यात येत आहे.

सीरमने तिचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी यूएसमधील बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत एकत्र येऊन काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी १० ते ४० कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात. सायरस पूनावाला म्हणाले की,डेंग्यूची लस वर्षभरात बाजारात येईल तसेच ती डेंग्यूच्या सर्व स्ट्रेनवर प्रभावी ठरणार आहे. सीरमकडून लवकरच ही व्हॅक्सिन बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version