पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या स्वागतासाठी देहू संस्थान सज्ज झाले आहे. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ह्यासाठी १० पोलीस उपायुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३०० पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, २००० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर तीन दिवस नाही तर एकच दिवस बंद राहणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १४ तारखेला मोदींच्या भेटीनंतर २० जूनला पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू देवस्थानची लगबग दिसून येत आहे. दरम्यान सुरक्षेसाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी आता फक्त मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले असून भक्तांना मंदिरात जाऊन देवाचे चरणस्पर्श करता येणार नाही आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version