शेतकऱ्यांचे आंदोलन माघारीचा निर्णय ४ डिसेंबरला

शेतकऱ्यांचे आंदोलन माघारीचा निर्णय ४ डिसेंबरला

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्या विरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन पुढील दिवसांत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या ४ डिसेंबरला शेतकऱ्यांचे आंदोलन माघार घेण्याचे संकेत किसान सभेकडून मिळाले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने संसदेत तीनही कृषी कायदे मागे घेणाऱ्या विधेयकाला मंजूरी दिल्यामुळे शेतकरी आंदोलन माघारी घेण्याच्या निर्णयात आहेत. तसेच हमीभावासाठी सरकार समिती गठीत करणार आहे. दरम्यान हमीभाव समितीसाठी संयुक्त किसान सभेकडून ५ नावांची मागणी करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारने कृषी कायदे मगे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच ज्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन पुकारले होते, त्या मागण्या सफल झाल्या आहेत. तसेच केंद्राने हमीभावासाठी समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला  आहे. त्यामुळे ४ डिसेंबरला शेतकऱ्यांचे आंदोलन माघारी घेण्याच्या निर्णयाचे संकेत किसान सभेकडून मिळाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version