पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात दुर्देवी घटना घडली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोद्दार महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांकडून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयात बीएएमएस पदवी शिकणाऱ्या दयानंद काळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील सेवा अभावी या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. बुधवारी रात्री झाडावरून पडल्यानं या विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, या विद्यार्थ्यावर त्वरीत रुग्णालयीन उपचार न करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दयानंद काळे या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, असा आरोप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थी आक्रमक झाले असून विद्यार्थ्यांकडून त्वरीत रुग्णालय सेवा बंद करण्यात आली.

दरम्यान, वैद्यकिय महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षित नसल्याचा आरोप विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे. जखमी विद्यार्थ्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. तर उपचारासाठी त्याला स्पर्श देखील केला नही. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version