अमरावतीच्या अचलपूर, परतवाडा शहरात जमावबंदी

अमरावतीच्या अचलपूर, परतवाडा शहरात जमावबंदी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री १० वाजेदरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल रात्री १०च्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात वाद निर्माण झाला. यावेळी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमरावतीलील दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. सध्या दोन्ही शरहात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल आहे. दरम्यान, दोन्ही शहरात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेनंतर येथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलिसांची अतिरिक्त तुकडीसुद्धा बोलवण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version