आंबेनळी घाटात दरड कोसळली

आंबेनळी घाटात दरड कोसळली

रायगड, २८ जून २०२३, प्रतिनिधी: रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा असणाऱ्या आंबेनळी घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री दरड कोसळली. या घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा असणाऱ्या आंबेनळी घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री दरड कोसळली. या मुळे या घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरडीमुळे रस्त्याचा एक भाग खचून दरीत पडला आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

महाबळेश्वर परिसरात तसेच या घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने घाटात दरड कोसळण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एक मोठी दरड घाटात कोसळली. यामुळे येथील रस्ता देखील खचला आहे. दरम्यान, या घटनेत जीवित हानी झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version