खंडणीप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मात्र फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर काल मुंबईत दाखल झाले. परमबीर सिंह यांची कांदिवलीमधील गुन्हे शाखेत खंडणी वसुली प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने परमबीर सिंह यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला आहे. परमबीर सिंह न्यायालयासमोर हजर राहिल्यामुळे अजामीनपत्र वॉरंट रद्द करण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वीही परमबीर सिंह यांना हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मात्र आता न्यायालयाने परमबीर सिहं यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे.
‘मी भारतातच असून माझ्या जिवाला धोका असल्याचे’ वक्तव्य परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे परमबीर सिंह यांनी त्यांच्या वकिलामार्फत सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. न्यायलयाच्या या निर्णयामुळे परमबीर सिंह मुंबईत चौकशीसाठी हजर झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.