नाशिकमध्ये कोरोना निर्बंध कायम

नाशिकमध्ये कोरोना निर्बंध कायम

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे केंद्र सरकारने नवे अनलॉक निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ४ मार्चपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, नाशिकमध्ये कोरोनावरील निर्बंध कायम असणार आहेत.

नाशिकमध्ये नागरिकांमध्ये ९० टक्के लसीकरण न झाल्यामुळे निर्बंध शिथिल न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे निर्बंध नको असल्यास नागरिकांनी लसीकरण करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नाशिकमध्ये पहिला डोस ८६ टक्के नागरिकांनी घेतला आहे तर दुसरा डोस ६० टक्के नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिकमधील निर्बंध कायम असणार आहेत.

नाशिकमध्ये ५० टक्के क्षमतेचे निर्बंध कायम

नाशिकमध्ये ९० टक्के लसीकरण पूर्ण न झाल्यामुळे नाशिकमध्ये ५० टक्के क्षमतेचे निर्बंध कायम असणार आहेत. विवाह, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात ५० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. तर हॉटेल, नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी देखील ५० टक्के उपस्थिती आहे. तसेच कोरोना नियमंचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून अनलॉक

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये येत्या ४ मार्चपासून नाट्यगृह, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू  होणार आहे. तर इतर जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या १४ जिल्ह्यांमध्ये ४ मार्चपासून कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version