देशात कोरोना पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले असून पंतप्रधान मोदीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस बुधवारपासून ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे याप्रकरणी भाजपने जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे यासाठी काँग्रेस भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
नाना पटोले म्हणाले, पंतप्रधानांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्यामुळे दु:ख झाले आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे भाजपने आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा उद्यापासून काँग्रेस महाराष्ट्राची माफी मागवी, असे फलक घेऊन भाजपच्या कार्यालयाबाहेर माफी मागो आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.