शिर्डीत काँग्रेसचं चिंतन शिबीर

शिर्डीत काँग्रेसचं चिंतन शिबीर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत मंगळवार पासून सुरु होत आहे. १ आणि २ जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या शिबिरामध्ये पार्टीचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, सर्व कॅबिनेट मंत्री, पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

याबाबत थोरात म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा आणि महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणी संदर्भात आखणी करतील आणि त्यावर समूह चर्चा होईल. तर दुसऱ्या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल.’

‘निवडणुकांची तयारी ही सतत करावी लागत असते. फक्त निवडणुका आल्या की तयारी करता येत नसते. काँग्रेसचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी हे शिबीर आयोजित केले आहे. असं सांगताना आम्ही तिन्ही पक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र आलो आहोत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे’. असही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version