कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेचा दावा

कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेचा दावा

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत शिवसेना आणि काँग्रेस या मावितातील दोन्ही राजकीय पक्षांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

मागील निवडणुकीत ही जागा शिवसेनेने गमावली असल्याने आता माविआअंतर्गत शिवसेनेसाठी जागा सोडावी असा आग्रह केला जात आहे. मात्र, काँग्रेस हा आग्रह फारसा गांभीर्याने घेताना दिसत नाही आहे. राजेश क्षीरसागर यांना स्वतःसाठी उमेदवारी हवी असताना काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावाचा विचार सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. जयश्री जाधव या कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. पती काँग्रेसचे आमदार झाल्यानंतरही त्या भाजपमध्येच कार्यरत होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version