मनसेच्या सभेला सशर्त परवानगी

मनसेच्या सभेला सशर्त परवानगी

मसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून अटीशर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देत असताना राज ठाकरे यांना १५ अटी घालण्यात आल्या आहेत. सभेला परवानगी दिल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे आता १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे मनसेची सभा पार पडणार आहे. औरंगाबाद पोलिसांकडून अटीशर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या सभेत काय बोलणार यांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यासभेसाठी ‘या’ आहेत अटी-शर्थी

ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.

लहान मुलं, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी.

इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळे धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.

व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.

वाहन पार्किंगचे नियम पाळावे.

सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.

सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत.

सामाजिक सलोखा बिघडेल, असे वर्तन करू नये.

कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version