सीएनजी स्वस्त झाला

सीएनजी स्वस्त झाला

मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात अडीच रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे, सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किंमत अडीच रुपयांनी कमी झाली आहे. सीएनजीचा नवा दर ८७ रुपये असून सर्व करांसह सुधारित आहे. मंगळवार, ३१ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्रीपासून किंवा १ फेब्रुवारीच्या सकाळपासून मुंबई, मुंबई उपनगर आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात हा दर लागू होणार आहे. यापूर्वी सीएनजीचा दर ८९.५० पैसे प्रति किलो होता. मुंबईतील सध्याच्या पेट्रोल किमतीच्या तुलनेत सीएनजी ४४ % बचत करत आहे.
रिक्षाचालक, टॅक्सिचालक आणि सर्वसामान्य नागरिक यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच, सीएनजीचे दर कमी झाल्यामुळे रिक्षा, टॅक्सीचेही दर कमी होण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version