खडसे आमचे नेते त्यांना राज्यात ठेवायचं की केंद्रात ते आम्ही बघू – मुख्यमंत्री

खडसे आमचे नेते त्यांना राज्यात ठेवायचं की केंद्रात ते आम्ही बघू – मुख्यमंत्री

माजी मंत्री एकानाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते त्यांना राज्यात ठेवायचं की केंद्रात ते आमचं आम्ही बघून घेतो. एका पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान ते भुसावळ मध्ये बोलत होते. खडसे यांना आगामी निवडणुकीत युतीची सत्ता आली तर मंत्रिमंडळात घेण्यात येईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता.

खडसेंना कुठं ठेवायचं ते आम्ही बघू!

माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. खडसे यांना आगामी निवडणुकीत युतीची सत्ता आली तर मंत्रिमंडळात घेण्यात येईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भुसावळ येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांनी खडसेंच्या प्रश्नावर उत्तर देताना वेगळेच संकेत दिले आहेत.

त्यामुळे खडसेंना राज्यसभेवर पाठविण्यात येऊ शकते. राज्यसभेवर घेऊन खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडून केला जाऊ शकतो. तर, राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंना विधानसभेचं तिकीट देऊन खडसेंची नाराजी चांगलीच दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे.

दरम्यान, मी पक्षाकडे विधानसभेलाच उमेदवारीची मागणी करणार आहे, असं एकनाथ खडसेंनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन, खडसे राज्यातच राहण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतं. तशी चर्चा ही राजकीय वर्तूळात होतं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version