Chinese Naval Jet Crash: चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी चीनमध्ये प्रशिक्षण सरावादरम्यान एक नौदल लढाऊ विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातादरम्यान पायलट विमानातून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
चीनमधील या अपघातानंतर नौदलाने एक निवेदन जारी केले आहे. नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर्न थिएटर कमांडचे जेट दुपारी हैनानच्या दक्षिणेकडील बेटावरील जिआलाई शहराजवळील एका मोकळ्या जागेत कोसळले.
हेही वाचा – कॅनडामध्ये मोठा अपघात! लँडिंग करताना Delta Airlines चे विमान Toronoto Airport वर कोसळले; 19 प्रवासी जखमी
चिनी नौदलाचे लढाऊ विमान कोसळले; पहा व्हिडिओ –
NEW: Chinese J-15 fighter jet crashed during a training accident. The pilot ejected safely. J-15 is a Chinese twin-engine, all-weather, carrier-based multirole fighter for the People’s Liberation Army Naval Air Force (PLANAF). pic.twitter.com/JiPXBGobC5 — Clash Report (@clashreport) March 15, 2025
अपघाताची चौकशी होणार –
तथापि, हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, वैमानिक विमानातून यशस्वीरित्या बाहेर पडला. तसेच या अपघातामुळे जमिनीवर कोणतेही नुकसान झाले नाही. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने सांगितले की ते घटनेनंतर अपघाताच्या कारणांची चौकशी करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.