शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका १२ वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना जालन्यात घडली आहे. सूर्यकांत उर्फ मोनू सर्जेराव म्हस्के असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील राहुल नगरमध्ये मंगळवारी सायंकाळी गल्लीत खेळत असताना त्याचा महावितरणाच्या विद्युत खांबाला हात लागला. खांबामध्ये विजेचा प्रवाह उतरलेला असल्याने मोनूला विजेचा शॉक लागून तो चिकटला गेला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय भरती केले होते, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ पसरली आहे.

राहुलनगर परिसरातील विजेच्या खांबात गेल्या २ दिवसांपासून विजेचा प्रवाह उतरत असल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती महावितरणला दिली होती. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच मोनूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हकनाक निष्पाप मुलाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अतिशय वेदनादायी आणि संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे, त्यामुळे परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप चिमुरड्याचा मृत्यु झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version