मुख्यमंत्री शिंदेंनी वाटले पन्नास खोके

मुख्यमंत्री शिंदेंनी वाटले पन्नास खोके

रुग्णसेवेसाठी महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहायता निधीतून पन्नास कोटी रुपयांची मदत केली आहे. ५० खोके म्हणत टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंकडून कामातून उत्तर दिले आहे.

राज्यातील ६२०० रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५० कोटी देण्यात आले आहेत. अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित केली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे मूळ संकल्पक तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली.
नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १० कोटी २७ लाख आणि मार्च २०२३ मध्ये विक्रमी ११ कोटी ९५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

‘राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो’, असे कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी शेवटी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version