चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे ४७ व्य वर्षी निधन झाले आहे. खासदार बाळू धानोरकर यांचे आजारपणाने मंगळवारी (दि. ३० मे) पहाटे निधन झाले. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी तेही रुग्णालयात होते. वडिलांच्या अंतीम संस्कारासाठी ते भद्रावती येथे जाऊ शकले नाही. बाळू धानोरकर यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी उपचारासाठी नवी दिल्लीत पाठवण्यात आले होते. मंगळवारी (दि. ३० मे) सकाळी त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात येईल. तर, संध्याकाळी वरोरा येथे अंतिम संस्कार होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version