ओबीसी आरक्षण रद्द झाल्यापासून महाराष्ट्रात अनेक घडामोडींना वेग आला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून ओबीसींचे आरक्षण टिकवावे, या मागणीसाठी भाजपाच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर मोर्चा काढला.या मोर्चामध्ये भाजपा नेत्यांनीही सहभाग घेत राज्य सरकारची झोप उडवण्याच प्रयत्न केला. राज्यात ओबीसी समाज्याच्या राजकीय आरक्षणावरून जबरदस्त राजकारण सुरूच आहे.
यातच, मुंबईसह १४ महानगरपालिकांत ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे राजकीय पक्ष तथा ओबीसी समाजातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे,या मागणीसाठी भाजपाच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर मोर्चा काढला.
या मोर्चादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळेंवर टीका करत असताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. मोर्चादरम्यान संवाद सादत असतानाच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, ‘तुम्ही राजकारणात कशासाठी आहात ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’
राष्ट्रवादी मेळाव्यात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे :
राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. दरम्यान, ओबीसींना आरक्षण छगन भुजबळच देऊ शकतील, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात केले आहे. तसेच ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
राजकीय लोकांना श्राप देणे हे हास्यास्पद आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अधिकार दिला आहे. त्यामुळे श्राप याबद्दल अंधश्रद्धा नसावी. या सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणल्यामुळे असे बोलणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. माजी मुख्यमंत्री असं बोलून मूळ विषयाला बगल देत असतील तर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला काळीमा फासण्याचं काम ते करत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.