कृषी विभागाच्या वतीने तृणधान्य पाककला स्पर्धा 

कृषी विभागाच्या वतीने तृणधान्य पाककला स्पर्धा 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष २०२३ म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने हवेली कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. लोकांनी फास्टफूडच्या आहारी न जाता तृणधान्य खाऊन सुदृढ जीवनशैली ठेवली पाहिजे यासाठी ही जनजागृती घेण्यात आली. यात किन्हई गावातील महिलांना तृणधान्य मधील ज्वारी आणि बाजरी पासून नाविन्यपूर्ण पदार्थ बनवून त्यांची पाककला स्पर्धा देखील कृषी अधिकारी मनीषा शिरसाट यांनी घेतली. यात शेतकरी महिलांनी ज्वारी बाजरीपासून बनवलेले विविध पदार्थ बनवून स्पर्धेत सहभाग घेतला होता.

भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा व नियमित वापर करणारा एक प्रमुख देश आहे. सध्याच्या जीवनपद्धतीमुळे पौष्टिक अशा तृणधान्याचे क्षेत्र व वापर कमी होत असल्याने चालू वर्षी देश ते गावपातळीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामधून पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्यविषयक महत्त्व पटवून दिले जाणार आहे. याबाबतची सर्व कार्यवाही कृषी व कृषी संलग्न विभागांमार्फत केली जाणार आहे. गावागावांत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, महिला बचतगट, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने महिनानिहाय विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version