सोलापूर-पोलीस आयुक्तालयाच्या महिला समस्या निवारण केंद्रात पत्नीला तिनदा तलाक म्हणून तलाक देणार्या पतीविरोधात तिहेरी तलाक बंदी कायद्यान्वये पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पती एजाज अहमद शेख, सासरे इम्तीयाज शेख, दीर आयाज शेख यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या काही दिवसापासून पती व सासरच्या लोकांनी किरकोळ घरगुती कारणावरून वाद सुरू केला त्यामुळे पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्याबाबत चौकशीसाठी बोलावले असताना पोलिस स्टेशनच्या आवारात पती एजाज खान याने रागात पत्नीला एक जोरात चापट मारली आणि शिवीगाळ करीत तीन वेळा तलाक म्हणाला अशी तक्रार पीडितेनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.