भाजप नेते मोहित कंबोज आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
या कारवाई प्रकरणी आरोप फेटाळत, मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विट करून आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. असे वक्तव्य मोहित कंबोज यांनी ट्विट मध्ये केले आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन मी घाबरून जाईल असं वाटत असेल तर तसे नाही आहे . मी तथ्यांसह न्यायालयात जाईन.”
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1531653430044872704?s=20&t=i7lfvYxGg7VgEODX0fnHzg
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.