पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट

पाकिस्तानच्या पेशावरमधील मशिदीत बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली आहे.
पेशावरमधील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी नमाज पठण सुरु असताना हा बॉम्बस्फोट झाला आहे. नमाज सुरु असताना हल्लेखोराने आत्मघातकी बॉम्बने स्वतःला उडवले.
या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले आहे. हा बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला, हे अद्यापही उघड झालेले नसून घटनास्थळी पोलीस आणि तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे.
या बॉम्बस्फोटात मशिदीचा एक भाग कोसळला असून, मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version