केरळमध्ये बोट उलटली, २१ मृत्यू

केरळमध्ये बोट उलटली, २१ मृत्यू

मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी :  केरळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटक बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यात तनूर गावात पर्यटकांची होडी उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. बोटीमध्ये जवळपास २५ पर्यटक असल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तानुर परिसरातएक हाउसबोट रविवारी सायंकाळच्या सुमारास बुडाली. यामध्ये लहान मुलांसह १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही दुर्घटना ओट्टुम्पुरम जवळ घडली. त्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बोटीमध्ये २५ लोक सवार होते. १० पर्यटकांना जवळच्या खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला.

हा अपघात रात्री झाला असून अशा परिस्थितीत मदत दलाच्या जवानांना बचावकार्य करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारातही लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बचावासाठी टॉर्चच्या प्रकाशात लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.केरळमधील या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची संख्या १५ वर गेली आहे, अशी माहिती केरळाचे राज्यमंत्री वी. आब्दुराहमान यांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दल वस्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अपघाताचे कारण अजून समजले नाही. पाण्यात बुडालेल्या नौकेला किनारी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोट दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. मोदींनी मृतांप्रति शोक व्यक्त केला. तसेच या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाइकांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version