कोल्हापूर उत्तर विधानसभआ पोट-निवडणुकीसाठी आज मतदार पार पडत आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एकूण ३५७ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपच विजयी होणार असल्याचा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्र्यांसह अन्य नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात ठाण मांडून बसले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी ७० टक्के मतदान होणार असून या निवडणुकीत भाजपला फायदा होणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, विरोधकांनी काल पैसे वाटण्याबाबत जो बोभाटा केला याचा कोणताही परिणाम होणार नाही, या ठिकाणी भाजप विजयी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.