फडणवीस कुणाला म्हणाले…’सावध’?

फडणवीस कुणाला म्हणाले…’सावध’?

राज्यात कोळसा कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे राज्यात वीज संकट कोसळण्याची शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, भारनियमनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘सावध ऐका पुढल्या हाका’, असे म्हणत फडणवीसांनी मविआवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत भारनियमनाच्या मुद्द्यावरून मविआवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच. वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे’

तसेच त्यांनी दुसरे ट्विट केले की, ‘सावध! ऐका पुढल्या हाका, टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण, परिणाम दिसू लागले आहेत. अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे’

जळगाव भाजपाचे भारनियमाविरोधी आंदोलन

भारनियमनाच्या विरोधात जळगावात भाजपाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात सध्या होत असलेल्या भारनियमनाच्या विरोधात तसेच नियमीतपणे वीज पुरवठा व्हावा, या मागणीसाठी आज भाजपच्यावतीने जिहाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version