भाजपची राज्यपालांना हस्तक्षेपाची मागणी

भाजपची राज्यपालांना हस्तक्षेपाची मागणी

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष दिसून आले. तसेच सध्या चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. या सर्व घडामोडींवर भाजपने मौन पाळले होते. शिवसेनचा अंतर्गत विषय असल्याचे भाजपच्या वतीने सांगितले जात होते. मात्र आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी पत्रात काय लिहिले आहे ?

राज्यपालांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना

४८ तासात १६० पेक्षा जास्त निर्णय

विकास प्रकल्पांच्या नावाखाली कोटयावधी रुपयांना मान्यता

पोलीस दल आणि अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा घाट

निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा

मविआने दोन दिवसात घेतलेले निर्णय रद्द करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बुधवारी मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात आले आहेत. परंतु सध्या राज्यपाल कोरोनाबाधित असल्यामुळे या पत्रानंतर पुढे काय निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version