भारत जोडो यात्रेचा सोमवारी ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरमध्ये समारोप झाला.
श्रीनगरमधील बर्फवृष्टी दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी विरोधी पक्षाचे नेतेही राहुल गांधीं सोबत सामील झाले. या कार्यक्रमासाठी द्रमुक, एनसी, पीडीपी, सीपीआय, आरएसपी आणि आययूएमएलचे नेते उपस्थित होते. ‘भारत जोडो यात्रा ही निवडणूक जिंकण्यासाठी नव्हती तर द्वेषाच्या विरोधात होती’, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या कार्यक्रमात म्हणाले.
रविवारी २९ जानेवारी २०२३ रोजी, राहुल यांनी काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. भारत जोडी यात्रेदरम्यान पाच महिन्यांच्या कालावधीत १२ राज्ये फिरून पूर्ण करत त्यांनी एकूण ४००० किलोमीटरहून अधिक पदयात्रा केली आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.