आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या २५व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे पक्षनेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या एकाही नेत्याला निमंत्रित करण्यात आलेले नाही.
शपतविधीपूर्वी भगवंत मान यांनी ट्विट केले होते की, ‘सूर्याच्या सोनेरी किरणाने आज नवी पहाट उगवली आहे. शहीद भगतसिंह आणि बाबा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण पंजाब आज खटकर कलान येथे शपथ घेणार आहे. शहीद भगत सिंहच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी मी त्यांच्या मूळ गावी खटकर कलानकडे रवाना होत आहे.’
सूरज की सुनहरी किरण आज एक नया सवेरा लेकर आई है। शहीद भगत सिंह और बाबा साहब के सपनों को साकार करने के लिए आज पूरा पंजाब खटकड़ कलां में शपथ लेगा। शहीद भगत सिंह जी की सोच पर पहरा देने के लिए मैं उनके पैतृक गांव खटकड़ कलां के लिए रवाना हो रहा हूं। — Bhagwant Mann (@BhagwantMann) March 16, 2022
पंजाब विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असून आम आदमी पार्टीने विजयाचा झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ १८ जागा जिंकता आल्या आहेत. तसेच आपने ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.