सावधान ! कोराडी प्रकल्प १००% भराला

सावधान !  कोराडी प्रकल्प १००% भराला

राज्यात काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे, तर त्याचा फटका नागरिकांना बरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा बसला आहे, राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थती निर्माण झाली आहे तर नागरिकांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, सध्या राज्यात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे अनेक धरणे व मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहे, मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी मध्यम प्रकल्प सतत होणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के भरले असून सध्या या जलाशयाची पातळी ५.४५. मीटर ही असून उपयुक्त साठा १५.१२ द.ल.घ.मी.आहे. तसेच प्रकल्पाच्या सांडव्यातून ३.०९ क्युमेक विसर्ग सुरू आहे.

पावसाळ्यात जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पाची पातळी अजून वाढू शकते व सांडव्यावरून पाणी वाहून पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा वेळी नदीच्या काठावरील शेतकऱ्यांनी आपले गुरेढोरे व इतर मालमत्ता सुरक्षित ठिकाणी न्यावी जेणेकरून त्यांची कुठले प्रकारची हानी किंवा नुसकान होणार नाही, नदी नाल्याला आलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे वित्तहानी प्राणहानी झाल्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, अशा एक प्रकारचा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून वटहुकूमच पाटबंधारे विभागाने काढला असून याची सर्व जनतेने नोंद घ्यावी असे सहाय्यक अभियंता श्रेणी एक पटबंधारे उपविभाग मेहकर चे उपविभागीय अधिकारी देसले यांनी कळवले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version