‘बाळासाहेबांमुळे मुख्यमंत्री झालो’

‘बाळासाहेबांमुळे मुख्यमंत्री झालो’

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त राजकारणातील विविध नेते त्यांना अभिवादन करत आहेत. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं हे सरकार आहे. बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता आज मोठ्या पदांवर पोहचला आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्या विचारांवर प्रभावित होऊन आणि त्यांच्या आर्शीवादामुळे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आज काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांच्या आठवणींशिवाय एकही क्षण जात नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार, त्यांचा आदर आणि त्यांची शिकवण घेऊन आम्ही सरकार चालवत आहोत. सर्व योगदान बाळासाहेबांचं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची किर्ती देशातचनाही तर जगभरात पसरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version